कल्पना दारिद्र्य होतेच
त्या काळी "कल्पना दारिद्र्य" असलेली गाणी नव्हती असे मला वटत नाही. मेरे पिया गये रंगून, मेरा नाम चून चून चू , आणि किती तरी अनेक जी आज आठवत देखील नाहीत.प्रत्येकच काळात अशी गाणी बनत होती. जुन्या पिढीला नवीन पिढीची नुसती गाणीच नाही तर सावयी, वागणे, आवड-निवड, कपडे,वागणे-बोलणे सगळेच टाकाउ वाटत असते....यालाच कदाचित जनरेशन गॅप म्हणतात. लुका चिपी बहुत हुयी..., आज दिन चढिया, नैनो कि मत मानियो, ये जो देस है तेरा ही गाणी ऐकताना गळ्यात आवंढा येतो, पोटात कालवाकलव होते निदान मला तरी.... या शब्दांना मी तरी "कल्पना दारिद्र्य" म्हणणार नाही...