आताची सगळीच गाणी लिहिताना गीतकारांचे कल्पना दारिद्र्य दिसते असे म्हणता येणार नाही. आजही अनेक उत्तमोत्तम गाणी लिहिली जातात. अर्चनाने त्यांचा उल्लेख केलाच आहे. मुळात कल्पना दारिद्र्य हे व्यक्तिसापेक्ष असते कालसापेक्ष नसते. मला ज्या कल्पना सुचतात, त्या तुम्हाला सुचतीलच असे नाही. आजही अनेक चांगले गीतकार, संगीतकार आहेत. आजपासून पन्नास वर्षांनंतर " शीला की जवानी" किंवा "मुन्नी बदनाम ही" वाजणारच नाहीत याची कोण हमी देवू शकतो? "मेरे अंगनेमे" अजूनही ऐकले जातेच ना. काळ बदलतो तसे कला ही बदलत असतात, हे कृपया समजून घ्यावे, सहगलची गाणी आजच्या मुलांना आवडत नाहीत पण एखाद्या मुलाला आवडूही शकतात. आशाबाईंच्या प्रतिभेबद्दल दुमत नाहीच. त्यावेळच्या कलाकारांबद्दल आम्हा सर्वांना आदर आहेच तसेच आजचेही नव्या दमाचे कलाकार प्रशंसेस पात्र आहेत. त्यांच्यावर टीका करण्याचे काही एक कारण नाही. रहमानसारखा आंतरराष्ट्रीय बहुमान जुन्या संगीतकारांना मिळाला होता का? याचा जुनं तेच सोनं असं म्हणणाऱ्यांनी विचार करावा.