आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे तेव्हा कौतुक नव्हतेच. हेमामालिनीच्या आधी काय चांगल्या नायिका नव्हत्या का? पण 'नंबर १' हा ट्रेंड हेमानेच आणला न? तसेच संगिताचे आहे. नाहीतर नौशाद, मदनमोहन, वगैरे कलाकार सातासमुद्रापलिकडे नक्कीच पोचले असते. मुकेशने त्याचे पहिले गाणे 'दिल जलता है तो जलने दे' संगीतकार अनिल विश्वास यांच्याकडून थोबाडीत खाऊन मग रेकॉर्ड केले होते हे सर्वश्रुत आहे. आता असे होऊ शकते का? नाही. कारण तो आपलेपणा आता राहिला नाही. एवढेच. पण ज्यांनी त्या काळी मेहेनत घेऊन रात्र-रात्र एका एका गाण्याचे रेकॉर्डिंग केले आहे त्यांना हा कोरडेपणा नसेल पटत. गाण्यात शब्दांना महत्त्व असते हे मानणाऱ्यांना आपले मत नोंदवायचा अधिकार असतोच. जसा आशाताईंना 'ग' ची बाधा झाली म्हणणाऱ्यांनी आपला हक्क बजावला आहे.
टीप : आजच्या कवींमध्ये कल्पनादारिद्र्य आहे हे माझे विधान आहे. आशाताईंचे नाही याची कृपया नोंद घ्यावी. त्या बिचाऱ्या असे काही म्हणणार नाहीत.