साबुदाण्याच्या खिचडीचे खरच खूप वेगवेगळे प्रकार आहेत. उकडलेल्या बटाटयाच्या फोडी घालून, मिरच्या,मीठ यांचा कुटून बारीक केलेला गोळा फोडणीमधे घालुन, काही जण काकडी चोचवून घालतात. काही दक्षिणी बायका खिचडीमधे कांदा पण घालतात. काही जण बटाटे न घालता लाल तिखटमीठ घालुन करतात. काहीजण खिचडीमधे दही तर काही दूध घालून खातात. कुणाला गोळा झालेली खिचडी आवडते तर कुणाला मोकळी झालेली.
मला माझ्या आईच्या हातची खिचडी खूप आवडते. ती साजुक तुपात जिरे, हिरव्या मिरच्यांचा गोळा व खवलेला नारळ घालते,शिवाय बटाट्याच्या फोडी, त्यामुळे खूपच छान चव येते खिचडीला.
श्री पेठकर यांची पध्दत पण चांगली आहे. वाचल्यावर लगेच कराविशि वाटते.