आजकालच्या संगीतकारांची गाजलेली गीते एकतर सूफी गीते, 'ससुराल गेंदा फूल' वा 'लिंबुडा लिंबुडा' सारखी लोकगीते, आणि धांगडधिंगा असलेली समूहगीते असतात. सुरेख कवितेपासून होणारी झालेली गीतनिर्मिती आजकाल दुर्मीळ झाली आहे.
'मैने प्यार किया' जेव्हा आला तेव्हा लोक म्हणू लागले की आता भारतीय चित्रपटसंगीत परत बहरणार. कुठे काय झाले? चित्रपटाचे संगीत बरे असले तरी गाण्यांचा काय दर्जा होता? 'कबुत्तर आ आ आ' असली गाणी कधीच अजरामर होत नाहीत. (चित्रपटातले एक लोकगीत फार छान होते. पहिल्यांदा मी काश्मीरमध्ये ऐकले, नंतर लखनौमध्ये, आणि नंतर उल्हानगरमध्ये एका लग्न समारंभात. गाण्याची फक्त चाल आठवते, शब्द नाहीत. चित्रपटाचा नायक काहीतरी दगडकाम करीत असताना त्या खेड्यातील स्त्रिया कपडे वाळत घालता घालता ते गाणे म्हणतात, एवढेच लक्षात आहे).
गुलजारने लिहिलेले आणि रेहमानने संगीतबद्ध केलेले 'जय हो' रेडिओवर कुणी कधी ऐकले आहे? इतक्या भिकार गाण्याला अकॅडमी अवॉर्ड देऊन तिथल्या परीक्षकांनी आपल्या अकलेचे दिवाळे जाहीर केले आहे.