इतक्या सगळ्यांनी शब्दकोश उघडून पाहिले पण कुणालाही खीच्‍च, खीच्‍चा किंवा खीच्‍चे  सापडलेला दिसत नाही.  यावरून एकतर  शब्दाचे लिखाण योग्य नसावे किंवा हा अगदीच बोलीभाषेतला शब्द असावा. मराठी शब्दांतले अनुस्वारयुक्त अक्षर नेहमी ऱ्हस्व असते, तसेच बहुधा द्वित्तापूर्वीचे.  उदा० चिंच, सुंठ, लिंब, उट्टे, लुच्‍चा, चुप्प, फिक्‍का, द्वित्त वगैरे. खीच्‍चेमधला खि ऱ्हस्व असावा असे वाटते. ---- अद्वैतुल्लाखान