नागपूर विषयी जास्त माहिती साठी, मराठी विकीपिडीया वर "नागपूर" शोधा.
महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्या विषयी इथे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. विकीपिडीया मुक्त ज्ञानकोश द्वारे मराठी भाषेला आपलं योगदान करा ही विनंती. तूमचा आवडता विषय, व्यक्तीरेखा, खेळ, इतिहास बद्दल काहीही माहिती तूम्ही इथे मांडू शकता. मराठीत भरभरून माहिती उपलब्ध करून देणे हाच ह्या मागचा उद्देश आहे. आजच्या तारखेला बरच योगदान झालेलं आढळतं. प्रत्येकानी काहीतरी नवीन माहिती पूरवली तर लवकरच हा मुक्त ज्ञानकोश वेग पकडेल. काही इतिहास येणार्या पिढीला उपयूक्त ठरेल. मराठी भाषेला रोजच्या जिवनात स्थान देण्यातही हा मार्ग उपयूक्त ठरेल. जास्तत जास्त कारभार मराठीत करायचा असेल तर जास्तत जास्त माहिती पण मराठीत उपलब्ध करावी लागेल.