हा नियम मला माहिती नव्हता. जालावर कोणत्या क्रमाने प्रकाशित करावे याबाबत मी काही विचार केलेला नव्हता. इतरत्र प्रकाशित केल्यानंतर २ दिवसांनी लक्षात आले की मी येथेही प्रकाशित करू शकतो. मी जालावर कोणत्याही प्रकारचे लेखन महिनोन महिने करत नसल्यामुळे किंवा वाचायला सवड नसल्यामुळे मी कोणकोणत्या पोर्टल्सचे सदस्यत्व पत्करून ठेवले आहे हे लक्षात राहत नाही. यापुढे जर मला उशीरा लक्षात आले की मनोगत वर प्रकाशित करायचे राहिले आहे, तर ते मी सहा महिन्यांनतर प्रकाशित करीन. (तेव्हा लक्षात रहायला मात्र पाहिजे).

हा नियम का आहे हे विचारण्याचा अधिकार मला नाही, आणि ह्या कृतीमुळे जर मनोगताचा अवमान झाला असल्यास क्षमस्व. 

मनोगत हे एक दर्जेदार संकेतस्थळ आहे, आणि समजा माझ्यासारख्याच एखाद्याने चुकून इतरत्र प्रकाशित करून मग नंतर मनोगतावर प्रकाशित केल्यास मनोगताला गौण स्थान दिल्याचा समज कृपया स्वतःहून करून घेऊ नये. इतरत्र प्रकाशन आढळल्यास, ती कॉपी नाही ना हे तपासून घेतल्यानंतर निर्दोषी आढळल्यास प्रकाशित करण्याची मुभा असावी असे माझे वैयक्तिक मत आहे.