चेतनजी तुमचे सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत. मुंबईकरांची व्यथा हीच तर आहे न? शरद पवारांना एक थप्पड मारली तर गदारोळ करणारे राजकारणी सामान्य माणसाला मात्र गृहित धरतात. ज्यांचे जीव जातात त्यांचे कोणाला सोयर सुतक नाही. कसाबला ' सरकारचा जावई ' म्हटल्याचा राग आला पण त्याला तशीच ट्रिटमेंट दिली जाते आहे. त्याला जिवंत पकडून त्याच्याकडून माहिती काढायची होती. किती काढली कोण जाणे. शेवटी एखादा दिवस असा येईल की सामान्य मुंबईकर कायदा हातात घेईल. सरकारकडून काही होणार नाही. चेतनजी तुमची प्रतिक्रिया वाचून आपल्या असहायपणाची लाज वाटते. आपला 'सहिष्णू'पणा 'षंढ'पणाकडे चालला आहे याची कोणाला लाजच राहिली नाही. जीव गलबलून येतो. त्याला फाशी द्यायला म्हणे चांडाळ मिळत नाही. ही पटणारी गोष्ट आहे का?
(संपादित : प्रशासक)