लोकांना घाबरवण्यात या जाहिरातींचा सर्वात मोठा हात असतो हे खरे आहे. आयोडीन नमकचे असेच आहे. वास्तविक मी कुठेतरी वाचल्याचे आठवते की सर्वांनाच याची गरज नसते. समुद्र जवळ असणाऱ्यांना, म्हणजे जिथे दमट हवा आहे तिथे राहणाऱ्यांना फारशा आयोडीनची गरज नसते. मात्र जे समुद्रापासून लांब राहतात त्यांना याची आवश्यकता असते. कदाचित दमट हवेत क्षार असतील. मला नेमके माहित नाही. पण अगदी 'तुमचे मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग होऊ शकते' असे म्हटले की लोकं घाबरणारच. आम्ही साधे गाय छाप मीठ वापरतो. पण मध्ये ते मिळेनासे झाले. मग लोकांनी आरडाओरडा केल्यावर त्यावरची बंदी उठवली बहुतेक. वास्तविक आयोडीन जास्त झाले तर थायरॉईडचा त्रास होऊ शकतो असे वाटते. जाणकारांनी याचा खुलासा नक्कीच करावा.