तुम्ही विषय भलती कडे घेउन चालला आहात. धर्म , अर्थ, काम इ. मला मान्यच आहेत. विषय हा स्त्री पुरुष संबधा बद्दल आहे.
मोहा पासून दुर राहून ठाम नकार देणे हे पुरुषास आले पाहिजे. आपल्या मतावर ठाम राहणे व त्याचे साठी आपले सर्व आयुष्य वेचणे हे
आपण खुपश्या मोठ्या व्यक्ती पासून शिकू शकतो. असा पुरुषार्थ अपेक्षित आहे.

विश्वामित्र मेनके बाबतही ठाम नकार मेनका कशी देउ शकेल तिला त्याच कामासाठी पाठविले होते, पण विश्वामित्र मात्र त्यांचे मुख्य कार्य विसरून तिच्या आहारी गेले, अश्या मोहाच्या प्रसंगी ठाम पणे नकार देणे हा पुरुषार्थ न कि तिच्या बरोबर वाहवत जाणे. आजही पुरुष ठाम
पणे नकार देणे शिकू शकले नाहित, त्याने अग अग म्हशी, मला कुठे नेशी! अशी त्यांची गत होते.  

हा माझा मुद्दा आहे आपण त्याला पुरुषार्थ त्रयींकडे घेउन गेलात.