एका प्रख्यात हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शकाची  सारंगी कलकत्याच्या एका लॉजमधून चोरीला गेली.  एका स्थानिक कलकत्तावासीयाला घेऊन ते गाणाऱ्या बायकांच्या वस्तीमधून मध्यरात्रीपासून फिरत राहिले. अगदी पहाटेपहाटे एका घरातून ऐकू येणारे सारंगीचे सूर ऐकून ते आपल्याच सारंगीतून निघत आहेत हे त्यांनी ओळखले. ताबडतोब माडीवर जाऊन त्या संगीत दिग्दर्शकांनी  आपली सारंगी ताब्यात घेतली.  आता असे संगीत दिग्दर्शक आहेत?