मोहापासून दुर राहून ठाम नकार देणे हे पुरुषास आले पाहिजे.

पुढे तुम्ही म्हटलय:

आपल्या मतावर ठाम राहणे व त्याचेसाठी आपले सर्व आयुष्य वेचणे हे आपण खुपश्या मोठ्या व्यक्तीपासून शिकू शकतो. असा पुरुषार्थ अपेक्षित आहे.

स्वामीश्री,

पहिला मुद्दा, स्त्री-पुरुष संबंधातला पुरुषार्थ 'मोहापासून दुर राहून ठाम नकार देणे हे पुरुषास आले पाहिजे' असा घेतलात तर सहजीवनाचा केंद्रबिंदू प्रणय संपेल. त्या संबंधात स्त्रीला तृप्त करणं हा खरा पुरुषार्थ आहे.

दुसरा मुद्दा, 'आपल्या मतावर ठाम राहणे व त्याचे साठी आपले सर्व आयुष्य वेचणे ' ...हेच तर सहजीवनाच्या कलहाचं कारण आहे. प्रसंगाकडे निर्वयक्तिकपणे पाहून, दोघांना (आणि जमल्यास सर्वांना) काय सुखाचं होईल ते करणं हा सूज्ञपणा आहे.

मेनका आणि विश्वामित्रावर मला स्वतंत्र पोस्ट लिहिता येईल पण हा विषय मी 'अर्थ, काम आणि मोक्ष' या इथे प्रकाशित झालेल्या लेखात सविस्तर मांडलाय, जरूर पहावा.

संजय