जुन्या गाण्यांच्या आठवणीने गंहिवरून जाणाऱ्या एकानेही " आज काल " याविषयी त्यांची व्याख्या न देता " बीटिंग अरोउंड द बुश " असा प्रकार चालवला आहे‌. संगीतबाह्य मुद्दे म्हणजे स्टुडिओची शुद्धी करणे किंवा आपली सारंगी चोरीला गेलेली तिचे सूर ऐकताच ओळखणे  वगैरेंचा उल्लेख केल्याने त्याना जो काळ अभिप्रेत आहे त्याकाळातील संगीत वा गीत नंतच्या काळाच्या संगीत वा गीताहून श्रेष्ठ ठरते असा त्यांचा समज असेल तर अशा अनेक संगीतकारांच्या आठवणी सांगून ते श्रेष्ठ संगीतकार होते असे सिद्ध करता येईल. उदा : ओ. पी . नय्यर यांनी लता मंगेशकरचा आवाज न वापरता आपली कारकीर्द यशस्वी केली किंवा सज्जाद यांनी लता मंगेशकरलाच सुनवायला मागेपुढे बघितले नाही. जुन्याच संगीताची भलावण करणाऱ्यापैकी  एकानेही गुलजार, सुरेश भट, ग्रेस यांचे काव्य अथवा राहुलदेव बर्मन यांचे संगीत याविषयी चकार शब्दही काढला नाही. राहुलदेव हे तर आशाबाईंचे दैवत होते.त्यामुळे त्यांच्या संगीताविषयी आशाबाईंचे मत काय असेल हे वेगळे सांगायलाच नको. साठीच्या दशकातील किंवा त्याच्या पूर्वीची गाणी अजून ऐकावीशी वाटतात तशीच त्यानंतरच्या संगीतकारांची पुढील पन्न्नास किंवा अधिक वर्षे ऐकावी वाटणार नाहीत हे कशावरून ? शिवाय विस्मृतीत जाणारे संगीत वा गीत हे टाकाऊच असेल हे कशावरून ? अनुराधा  या पंडित रविशंकर यानी संगीत दिलेल्या चित्रपटातील गाणी फारच थोड्या लोकांच्या स्मरणात आहेत पण त्यांच्या दर्जाला तोड नाही.