१९५० ते १९७० या वीस वर्षातली गाणी आणि १९९० ते २०१० या वीस वर्षातली गाणी घ्या.
सहोदारण दुसऱ्या कालखंडातली तुम्ही फक्त दहा गाण्यांची इथे लिंक द्या आणि मग कुणालाही त्यातलं कोणतही गाणं किती वेळा ऐकावस वाटतं हे (किती दिवस हे राहू द्या) विचारून पहा. तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगतो सिनेगीतातून साधारण चार ते पाच मूड एक्सप्रेस होतात (प्रेमगीत : तरूण, प्रेमगीत : तरूणी, प्रेमाची युगुल गीते, विरह गीते, आनंदोत्सव (विवाह) आणि भक्ती अशा मूडसमध्ये विभागून ती दहा गाणी लिहा.
मग पहिल्या कालखंडातली त्याच मूडसची मी दहा गाणी त्यांच्यासमोर सांगीन (जी आज चाळीस वर्ष झाली तरी तितकीच गोड वाटतात)
इतका आढावा घेतला की तुम्हाला फरक कळेल, तुम्ही लगेच सारांशाला येणार नाही.
संदीप खरे, ग्रेस वगैरे कवी आहेत आणि ते हिंदीत लिहित नाहीत त्यामुळे त्यांना मध्ये घेऊ नका कारण आशाबाईंच्या वक्तव्याचा तो अनुरोधच नाहीये.
मी सांगीन त्या प्रत्येक गाण्याचं काँपोझिशन, त्याचं इंटरल्यूड, त्याची लिरिक्स मला संपूर्ण माहिती आहेत मी उगीच चर्चेसाठी चर्चा करण्यात वेळ घालवत नाही. मी जेव्हा ओ पी नय्यरला मानतो तेव्हा त्याच्या एकेका गाण्यातला गोडवा आत्मसात करून मी ते विधान करतो आणि त्याचं जवळजवळ प्रत्येक गाणं मला की बोर्डवर वाजवता येतं!
संजय