नाही त्यामुळे मी इथे प्रतिसाद देणं थांबवलं होतं पण तुमची एकेक वाक्य बघून मी प्रतिसाद दिला.

तुम्ही काय काय लिहिलंय ते पहा: 

> जुन्या गाण्यांच्या आठवणीने गंहिवरून जाणाऱ्या एकानेही " आज काल " याविषयी त्यांची व्याख्या न देता " बीटिंग अरोउंड द बुश " असा प्रकार चालवला आहे.

> संगीतबाह्य मुद्दे म्हणजे स्टुडिओची शुद्धी करणे... हे तुम्ही 'मोहे भूल गये सावरिया'  विषयी लिहिलंय, मी त्या गाण्याच्या सांगीतिक जादूविषयी लिहिलंय पण तुम्ही असांगीतिक मुद्दा उचललाय!

>उदा : ओ. पी. नय्यर यांनी लता मंगेशकरचा आवाज न वापरता आपली कारकीर्द यशस्वी केली  ..... ही वस्तुस्थिती आहे आणि ओ पी ची गाणी अजूनही हिट आहेत ती कालौघात विलीन झाली नाहीत ही बाजू तुमच्या लक्षात आली नाही.

>एकानेही गुलजार, सुरेश भट, ग्रेस यांचे काव्य अथवा राहुलदेव बर्मन यांचे संगीत याविषयी चकार शब्दही काढला नाही.... सुरेश भट आणि ग्रेस मराठी कवी आहेत आशाजींनी त्यांच्या विषयी म्हटलेलं नाही.

= गुलजार फक्त चमत्कृतीपूर्ण लिहितो आणि एका ओळीचा दुसरीशी संबंध नसतो मी त्याच्या हिंदी गाण्यांच्या लिरिक्सचा संपूर्ण अभ्यास केलांय (पार बंटी और बबली पर्यंत), अधूनमधून थोडा फार वेगळा विचार किंवा कल्पना सोडता त्याच्या शायरीत मला काही अर्थ वाटत नाही पण तो या चर्चेचा विषय नाही.

राहूल देवनि सांगीतिक प्रयोग केले पण तो एस डीं सारखं मेलोडियस संगीत देऊ शकला नाही हे माझं वैयक्तिक मत आहे.

>साठीच्या दशकातील किंवा त्याच्या पूर्वीची गाणी अजून ऐकावीशी वाटतात तशीच त्यानंतरच्या संगीतकारांची पुढील पन्न्नास किंवा अधिक वर्षे ऐकावी वाटणार नाहीत हे कशावरून ?

= तुम्ही उगीच कल्पनाविलास करताय, पूर्वीची गाणी आपण आणि आजची पिढी अजून ऐकते आणि म्हणते ही वस्तुस्थिती आहे

>शिवाय विस्मृतीत जाणारे संगीत वा गीत हे टाकाऊच असेल हे कशावरून? अनुराधा या पंडित रविशंकर यानी संगीत दिलेल्या चित्रपटातील गाणी फारच थोड्या लोकांच्या स्मरणात आहेत पण त्यांच्या दर्जाला तोड नाही.    

=  इथे तुम्ही दुहेरी फायदा घेताय,  विस्मृतीत जाणाऱ्या संगीताला टाकाऊ हा पर्यायवाची शब्द आहे कारण त्यात ओढ लावणारा गोडवा नाही, जे ओढ लावतं तेच स्मृतीत राहतं.

अनुराधाची सर्व गाणी लोकप्रिय नाहीत, 'मेरे मनका बावरा पंच्छी क्यों बार बार डोले' हे (बहुदा झिंझोटी रागातलं) गाणं लोकप्रिय आहे आणि ते विस्मृतीत जाणार नाही. तुमचा अभ्यास असेल तर त्या सर्व गाण्यांची यादी इथे द्या आणि पहा.

मी पार आजचं 'वाय धीस कोलावरी कोलावरी डी' पर्यंत सर्व ऐकून, विषयाचा संपूर्ण वेध घेऊन, एका बाजूनी ठामपणे लिहितो उगीच एकदा इकडून आणि एकदा तिकडून असा युक्तिवाद करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नाही. या शिवाय (ठाम असलो तरी) मी प्रत्येक गोष्टीवर ओपन आहे, कुणी खरंच अभ्यासपूर्ण लिहिलं तर मनापासून दाद देतो.

संजय