आशाजी गेली साठ वर्ष गातायंत आणि या विषयात त्या खरोखरी सर्वेसर्वा आहेत कारण त्यांनी स्वतः १९५० ते २०१० हा सर्व कालखंड नुसता पाहिला नाही तर त्यावर स्वतःचा देदिप्यमान ठसा उमटवलांय. अशा व्यक्तीनी काही विधान केलं तर आपण त्यावर विचार करायला हवा, अभ्यास करायला हवा, त्यानी आपल्या आयुष्यात गोडवा निर्माण होऊ शकेल पण काहीही अभ्यास नसताना, संगीताशी उगीच श्रवणमात्र संबंध ठेवून (आणि खरं तर त्याचमुळे) व्यथित होऊन इथे निव्वळ युक्तिवाद आणि तौलनिक चर्चा मला तरी निरर्थक वाटते म्हणून आता पुन्हा प्रतिसाद नाही.
संजय