डेक्कन ला गरवारे पुलाजवळ , संभाजी पुलाकडे जाण्याऱ्या रस्त्याच्या बाजुला 'अपना घर' म्हणुन उपहारगृह आहे. पोहे, खिचडि, शिरा, मिसळ असे मोजकेच पदार्थ तेथे मिळतात. त्यातील पोहे आणि खिचडि व गोड मसालेदार(आले घातलेले) ताक छानच आहेत. आठवड्यातून एकदा (उपवासाच्या दिवशी खिचडि खाण्यासाठी!) जरुर भेट देण्यासारखे ठिकाण.