आता ही चर्चा होत नसून वाद होतो आहे... कोणाला किती माहिती आहे? कोण आकस ठेवते ? गुलजार चांगला की वाईट? जुनं की नवं काय टिकेल? हा या चर्चेचा हेतु नव्हता. चांगलं आणि वाईट सगळ्याच काळात होतं आणि राहिल ही... लोकांना काय आवडेल याच्या मोजमापाचे काहीच परिमाण नाही. त्या मुळे त्यावर भांडत बसण्यात काहीच अर्थ नाही. भले भले काळाच्या ओघात लुप्त झाले. 

नवीन पिढीवर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे वाईट वाटून मी ही चर्चा सुरू केली होती. कारण माझ्या सारखी नवीन पिढीची व्यक्ती सगळ्याच प्रकारच्या संगीताचा आस्वाद घेते. टाकाऊ का टिकाऊ ते आम्हाला कळत नाही. विरंगुळा व आनंद देणे हा संगीताचा हेतू असावा असे वाटते तो हेतू नवे जुने सगळेच संगीत साध्य करते. बाकी कायमचे असे या जगात काहीच नाही. 

राम क्रुष्ण्ही आले गेले
त्या वीन जग का ओसची पडले... 

मग कोण गुलजार, कोण रहमान, कोण आशा आणि कोण लता? त्यावर वाद घालणारे आपण देखील कोण? 
त्या मुळे आपणा सर्वांना विनंती की हा वाद थांबवावा.. आणि नव्या जुन्या कुठल्याही आवडत असलेल्या संगीताचा आनंद घ्यावा. 
कारण येणाऱ्या काळात कुठले संगीत टिकेल हे बघायला आपण थोडेच टिकणार आहोत?