"बिवी हु मै बावर्ची नही, मुजे आता नही खाना बनाना... " असली गाणी आशा भोसले यांनी गायलीही असतील, पण ती बहुधा पोटासाठी. लता मंगेशकर जश्या फालतू वाटणारी गाणी गायला नकार देतात, तसे आशा भोसलेंना शक्य नसावे.  प्रस्तुत गाणे चांगले आहे असे आग्रह त्याही धरणार नाहीत.
"मेरे पिया गये रंगून" या शमशाद बेगमच्या बेहतरीन गाण्याला टाकाऊ म्हणणे अडाणीपणाचे आहे. त्यातले विनोदाच्या ढंगाने जाणारे कारुण्य न समजणारा माणूस अरसिकच म्हणायला पाहिजे. "धुंद येथ मी स्वैर झोकतो मद्याचे प्याले" या गाण्याची ती, अगदी अल्प प्रमाणात का होईना, दुसरी बाजू आहे.---अद्वैतुल्लाखान