जुने ते सोनेच. पण नवे ते चांदी तरी निश्चितच आहे - शेण नक्कीच नाही .
(विषय रुळावर आणण्यासाठी वापरलेल्या उपमांचा विपरियास होऊ नये)
अनेक मनोगतींनी विषय भलतीकडेच नेल्या मुळे मूळ विषय बाजूलाच राहतो आहे, हे वारंवार आठवण करून देऊनही विषय भरकटतोच आहे.
विषय मांडणाऱ्या अर्चना देशकर ह्यांच्या पहिल्या मनोगतास पुन्हा वाचून बघा. त्यात जून्या गाण्यांबद्दल अवाक्षर ही नाही. जूने सोनेच आहे हे परत परत सांगण्याची वेळ येऊच नये. नवे संगीत, संगीतकार, गीतकार निश्चितच मेहनती आहेत व उत्तमोत्तम संगीत देत आहेत. त्यांना कुचकामी / टाकाऊ म्हणून आशाताईं सारखया 'वेटरन' आणि 'आयकॉनिक' व्यक्तीने नाऊमेद खचितच करू नये.
नवीन पिढीस प्रोत्साहनाची गरज आहे. त्यांना हिणवू नये अशी माफक अपेक्षा...
अजय देशकर...