आशा भोसले बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून एक ढोबळ तुलनात्मक मत व्यक्त करून गेल्या आहेत हे लक्षात कोण घेणार? त्या सातत्याने नव्या कलाकाराना हिणवत आहेत, तसा 'अजेंडा' राबवत आहेत असे म्हणायचे आहे का?    

त्यांच्या प्रदीर्घ सांगितिक वाटचालीत लोकांच्या, सहकलाकारांच्या अनुदार वागणुकीचे अनुभव त्याना काय कमी आले असतील? इथेच एका विधानावरून त्याना 'ग' ची बाधा झाल्याचा निष्कर्ष काढला गेला, हिमेश सारख्या गेंगाण्याच्या पंक्तीत या महान गायिकेला बसवण्यात आले, त्याला तुम्ही इतक्याच हिरिरीने विरोध दर्शवलात का? आशा भोसले ग्रेट आहेत हे सिद्ध करण्यासाठी हिमेश ला छोटे ठरवावे लागेल? आपण सहमत आहात का?

तेव्हा आपणही 'बात का बतंगड' करून, अतिरेकी प्रतिक्रिया देऊन 'वेटरन' आणि 'आयकॉनिक' व्यक्तींचे माणूसपण नाकारू नये.

(तसेही 'भाई' लोकांच्या कृपेने कलाकार झालेले, अल्पस्वल्प यशाने आभाळाला टेकलेले कलाकार आशा भोसले काही बोलल्याने नाऊमेद होतील अशी पुसटशी शक्यताही नाही. ज्यांचे पाय जमिनीवर आहेत, ते या निर्विवादपणे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणार्या गायिकेच्या बोलण्याने नाऊमेद वगैरे होणार नाहीत. थोडेफार आत्मपरीक्षणच करतील. असो.)