" त्या सातत्याने नव्या कलाकाराना हिणवत आहेत, तसा 'अजेंडा' राबवत आहेत असे " असे मला ही वाटत नाही. त्याच प्रमाणे हीमेश रेशमियाची वकीली देखील मी केलेली नाही. आशा भोसले बोलण्याच्या ओघात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून एक ढोबळ तुलनात्मक मत व्यक्त करून गेल्या आहेत हे लक्षात घ्यावे हे आपले मत आवडले.

पण वरील अनेक प्रतिक्रीयांमधून नवीन कलाकरांना अगदीच नगण्य ठरवल्या गेले आहे ते चुकीचे वाटते. अगदी ६०/७० च्या दशकानंतर चांगली गाणी बनलीच नाहीत असे म्हणणे अन्यायकारक वाटले. आज खऱ्या अर्थानी नवनवीन प्रयोग होत आहेत, विविध वाद्यांचा वापर होत आहे. नवेनवे कलाकार येत आहेत, उलट मी तर म्हणेन की संगीत क्षेत्राला आज चांगले दिवस आले आहेत. हीमेश, मुन्नी, शीला यांचा तकलादू पणा मला पण कळतो पण एखादा सोनू निगम जेव्हा " अपने देस की मिट्टी की खुश्बू" किंवा" मेरा रंगदे बसंती चोला" गातो तेव्हा मला ते भिडते.  
मेरी सासो को जो महका रही है, मेरा कुछ सामान, जुठे नैना बोले, अलबेला सजन आयो रे (यादी खुप मोठी आहे) ही गाणी ७० नंतरच बनली ना? ही पण टाकाऊ वाटत असतील तर आम्ही खरच गाणी एकण्याच्या, कळण्यायाच्या बाबतही टाकाउ आहोत असे वाटते. 

आणि हरीभक्तजी सगळेच कलाकार 'भाई' लोकांच्या कृपेने कलाकार झाले असतील असे मला तरी वाटत नाही. झाले असतील तरी लोकांना ते आवडावे अशी काही 'भाई' कडुन सक्ती नसल्यामुळे लोकांची आवड ही त्यांचीच असावी असे वाटते.

तरीही आपली प्रतिक्रीया आवडली..."निर्विवादपणे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणार्या गायिकेच्या बोलण्याने नाऊमेद वगैरे होणार नाहीत. थोडेफार आत्मपरीक्षणच करतील." हा मुद्दा पटला देखील. 
नव्या पिढीनी जुन्याचा आदर्श कायम समोर ठेवावा व जुन्या जाणत्या मंडळींनी त्यांच्या अनुभवाची शिदोरी नवख्यांना द्यावी अशा मताची मी आहे. चुकाच काढत राहिलात, टिकाच करत राहिलात तर मुक्त मनानी नवे काम कसे होणार..?