कोणतंही मत हे स्वतःचं असतं. त्याचं सर्वसाधारण रूप करणं फारसं उपयोगी पडत नाही. नवीन कवी किंवा संगीतकार लवकर
निर्माण होणाऱ्या परिणामाची अपेक्षा करणारे असावेत असं आशाताईंन म्हणायचं असावं. आजकालचं संगीत हिट होणं म्हणजे
नक्की काय ते ठरवावं लागेल. काही म्हंटलं तरी जुनी गाणी शब्दांसहित लक्षात राहतात , नवीन गाणी तशी कमी आहेत. आजकाल
टिकाऊपणाला फारसं महत्त्व नाही, कारण बऱ्याच गोष्टी कमी वेळात उपलब्ध होतात. अमुक एक गोष्ट खूप काळ टिकली  याला
हल्ली फारस महत्त्व राहिलेलं नाही , तर ती किती लवकर बदलली याला महत्त्व आहे. अजूनही हृदयस्पर्शी गाण्यांचं महत्त्व कमी
झालेलं नाही, मग ती जुनी असोत की नवीन . असो. शेवटी  "बाबा वाक्यं प्रमाणम ".