तथाकथित भाई "पृथ्वीराज चव्हाण किंवा नारायण राणेंना" गायला द्या असे म्हणू शकतात का? - नाही. तसे होऊ शकत नाही हे कुणीही सूज्ञ व्यक्ती सहज सांगेल. पण एखाद्या कित्येक पटीने अधिक गुणवत्ता असलेल्या कलाकाराचा पत्ता साफ करून सुमार दर्जाच्या मर्जीतल्या कलाकाराची सातत्याने वर्णी लावू शकतात/ लावतात.
एखादे गाणे किंवा एखादी कला आपल्याला आवडलीच पाहिजे अशी सक्ती भाई करू शकतात का? - नाही. पण (प्रामुख्याने) फिल्मी जगताचे अर्थकारण लक्षात घेता एखादा सुमार कलाकारच सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिल इतपत प्रभाव टाकू शकतात, हस्तक्षेप करू शकतात इतकेच मला सुचवायचे होते. असो. मला जे काही म्हणायचे होते ते नेमकेपणाने व्यक्त होण्यासाठी तुमची मदत झाली. धन्यवाद.