खरं तर तुमचे 'हे' अगदिच काही 'हे' नसावेत. त्यांनि खरे तर ओळखली देखिल असेल... त्यांनि मुद्दामच हरल्यासारखे करून तुम्हाला आईसक्रिम देउन तुमचे मन जिंकले असेल! हा झाला प्रेमाचा आणि गमतीचा भाग...

गंभिरपणे सांगायचे झाल्यास... फोटोमधली भाजी 'मुळ्याच्या पाल्याची डाळ घालून' नव्हे तर 'डाळिची मुळ्याचा पाला घालुन' वाटते आहे! बराच मुळ्याचा पाला, थोडासा मुळा सुद्धा बारिक चिरून आणि अगदी थोडी डाळ अशी भाजी आम्ही करतो. झकास लागते. शिवाय डाळिऐवजी बेसन पेरून केलेली सुद्धा छान लागते... जरा भरभरित सुकी होते, पण खमंग लागते!