.... असेही वाटते कि जे माझ्या अभिरूचीला योग्य वाटत नाही ते इतरांनीही करू नये अशी जबरदस्ती मी कुणावर केली नाही पाहिजे. फारतर आपली मते जाहिरपणे मांडावीत .. पण दूसऱ्यानेही तिच मते योग्य आहेत असे मानावे असा अट्टहास असू नये ..
सामाजिक सहिष्णुता आणि शिस्त असावी ...
आज मी जेथे राहते, तिथल्या स्त्रीया अक्षरशः वाटेल तसे कपडे घालतात ... पण इथे मी कधीही छेडछाड झालेली पाहिलेली नाही . ती होतच नसेल असे नाही ... पण असे करणाऱ्याला इथे जबरदस्त शिक्षा केली जाते ... आणि प्रशासन ती शिक्षा अंमलात आणताना कुचराई करत नाही . त्यामुळे स्त्रीया निर्धोकपणे आणि आत्मविश्वासाने वावरू शकतात.
आणि म्हणूनच त्यांनी कोणते कपडे वापरावेत आणि कोणते नाही याची चर्चा सुद्धा होत नाही .