सगळे सुंदर दिसते असे म्हणणे आणि विद्रूप काहीही दिसत नाही असे म्हणणे... ह्या दोहोत एक फरक दिसतो.
विद्रूप काहीही दिसेना...
पाहणारा असा निष्कर्ष कधी काढेल? पाहत असलेल्या एकेका गोष्टीला विद्रूप आहे की नाही असे ताडून पाहिल्यावरच. हो ना? म्हणजे विद्रूपता शोधूनही सापडली नाही असा काहीसा तर्क होतो.