असेच दोन प्रसंग मागील विरोप चाळत असताना मिळाले
                       ---- ४ -------
वीर सावरकर एकदा बंगलोरमध्ये एका सार्वजनिक सभेत भाषण करताना हिंदीत बोलू लागले की लगेच सभेतील लोक " कन्नडमध्येच बोला तरच आम्ही भाषण ऐकतो " असे म्हणू लागले.
  यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले, " मी चौदा वर्षे सुप्रसिद्ध अंदमानच्या कोठडीत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होतो तेव्हां बंगाली स्वातंत्र्ययोध्यांकडून मी बंगाली शिकलो, तसेच उत्तर प्रदेशींकडून हिंदी, गुजरातींकडून गुजराती आणि पंजाब्यांकडून पंजाबी शिकलो, पण दुर्दैवाने कोणी कन्नड स्वातंत्रयसैनिक मला भेटला नाही नाहीतर मी निश्चितच मी कन्नडमध्ये बोलू शकलो असतो. शांतता

                     ----- ५ ----
चीनने भारतावर हला केल्यावर लोकसभेत गदारोळ उठला त्यात कृष्ण मेनन या पंडितजीच्या आवडत्या माणसावर टीका होऊ लागली, त्यामुळे पंडितजी अस्वस्थ होऊन म्हणाले " ज्या भागात गवताचे एक पातेही उगवत नाही अशा भागावर झालेल्या हल्ल्याविषयी संसद सभासद इतके का तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत मला समजत नाही "
त्यावर बँ नाथ पै ताडकन उठून विचारते झाले, " महाशय आपल्या एकही केस न उगवणाऱ्या डोक्याविषयीही असेच म्हणता येईल का? " शांतता