देव आनंद यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि "आनंद" मधलं डॉ. भास्कर बॅनर्जींच्या तोंडचं चित्रपटातलं
शेवटचं वाक्य आठवलं आणि तेच वाक्य, मला वाटतं, त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.

"आनंद मरा नहीं । "
आनंद मरते नहीं ।"

त्यांचा सळसळता उत्साह आणि ऊर्जा पाहता ८८व्या वर्षी निधन म्हणजे ऐन तारुण्यातला मृत्यू.
देव आनंद म्हणजे, "उत्साह आणि ऊर्जा पब्लिक अनलिमिटेड", अशी एक चालती-बोलती संस्थाच!
अशा व्यक्तीबद्दल, पेक्षा, "संस्थेबद्दल", आणखी काय बोलणार. पुन्हा एकदा म्हणावं लागेल,
"आनंद मरा नहीं । "
आनंद मरते नहीं ।"
                                                                                                                           ००००००००००००