वरदा, मोहना, प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!
वरदा, फूड मिल मस्तच! मोहना, मी एकदा फूड पोसेसरवर करून पाहिले होते पुरण, पण तरीही ते पुरणयंत्रावर जितके बारीक होते तितके झाले नाही. खरे तर पुरणयंत्रात सुद्धा पुरण गरम असताना जितके भरभर होते तितके नंतर पुरण गार झाल्यावर पटकन होत नाही. बारीक छानच होते पण गार झाल्यावर थोडे फिरवायला जड जाते. अर्थात पुरणयंत्राला लागलेले पुरण नंतर त्यात पाणी घालून कटाच्या आमटीसाठी उपयोगाला येतेच. आधी गरम पाण्यात डाळ भिजवली तर मग चांगले होते पुरण. २-३ वाट्यांचे करून बघायला पाहिजे एकदा.