कित्येक (जवळजवळ तीस)वर्षांपूर्वी ललितच्या दिवाळी अंकात कै. श्री. ना. पेंडसे यांनी त्यांच्या आठवणीतल्या मध्य मुंबईविषयी, खासकरून दादरविषयी एक सुंदर लेख लिहिला होता. त्यात जुन्या दादरच्या म्हणजे हिंदू/पारसी कॉलनी निर्माण होण्याच्या काळातल्या दादरच्या आठवणी होत्या. ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्यांमध्येही (असंक्षिप्त कलंकशोभा, कुलाब्याची दांडी वगैरे) शतकापूर्वीच्या मुंबईचे रम्य वर्णन आहे. इतकेच नव्हे तर ह. ना. आपट्यांच्या 'पण लक्षात कोण घेतो' मध्येही मुंबई डोकावलेली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. कथानकाच्या मागणीनुसार पार्श्वभूमीवर ती ती शहरे आणि त्या शहरांचे स्वभाव साहित्यकृतीमध्ये रंग भरीत राहातात. 'ए टेल ऑव्ह टू सिटीज' हे त्याचे अभिजात उदाहरण.
धन्यवाद.