पाककृती करायला सोपी वाटते. कदाचित चविष्टही असू शकेल. पण अर्धा किलो सॉसेजिससाठी पाव किलो चीज आणि दहा हिरव्या मिरच्या पाहून थोड्या प्रमाणात करण्याचा सुद्धा धीर होत नाही. शिवाय टमाटो, सोया, गार्लिक ही सॉस प्रकरणे नेहमीच्या स्वयंपाकात फारशी वापरली जात नाहीत आणि महिनोन्महिने फ्रिज मध्ये पडून राहातात. ह्यावर उपाय म्हणजे हे तीन जिन्नस ज्यात वापरावे लागतील अशा पाककृती इथे पाठवीत राहाव्या.