प्रशासक महोदय,
आज एक प्रतिसाद लिहीत असताना मी "देवनागरी टंकलेखन साहाय्य" हे चित्र चिकटवले आणि गमभन वापरले. तेंव्हा "टर्मिनेटेड रीक्वेस्ट ड्यू टू सस्पिशियस इनपुट डेटा" अशी एरर आली. ते चित्र काढून टाकून गमभन वापरले असता एरर आली नाही. त्यानंतर परत ते चित्र लावून प्रतिसाद पुर्ण करायचा प्रयत्न केला असता तीच एरर आली. आणि मग "बॅक" कळ दाबली असता लिहिलेला प्रतिसाद संपूर्ण खोडला गेला होता.
१. चित्रे चिकटवल्यावर अशी एरर का येते?
२. अशी काही एरर आली तरी लेखन खोडले जाऊ नये अशी सोय करता येईल का?