सांगलीला कधी गेलो नाही. आता भटकायला कारण मिळाले. उगीचच कधीतरी बिनकामाचा सांगलीला जाऊन कढी वडा खाऊन येतो. गेल्या महिन्यातच ओरिसातल्या संबळपूरला एका मिठाईच्या दुकानात अप्रतिम समोसे, खाजा, बालुशाही आणि काला जामून खाल्ले. हे पदार्थ अजूनही मुंबईपुण्यासह सगळीकडॅ मिळतात आणि ताजे असले तर छान लागतात. अस्तंगत झालेले नाहीत.
हरभट रोडची व्यूत्पत्ती मस्त.
कुलकर्ण्यांचे हॉटेल शोधून सापडले तर वड्याच्या आकाराबरोबर त्यांना देखील डोळे भरून पाहाणार.
सांगलीचे सिंह आणि 'सुंदर' हत्ती आवडले. आनंद थिएटरचे नूतनीकरण अप्रतिम.
परदेशी सर आणि आर्टस च्या मुलींचे इंजिनीयरिंगच्या मुलांवर डोळा ठेवणे सरळ आहे.
स्मरणरंजन अर्थातच आवडले. संवेदनाशील कोवळ्या मनावरचे नाजुक ठसे लेखनात तितकेच नवेनूतन प्रभावी वाटले.