मला स्मृतीत जगणाऱ्या लोकांविषयी सहानुभूती वाटते, त्यांचा वर्तमान सारखा हरवत राहतो. माझी आजी अशी होती (आणि आता मामा आहे) कायकाय आणि कितीकिती मागे घेऊन जातात ऐकणाऱ्याला! जसा सर्व उलगडा होत गेला तेव्हा लक्षात आलं की सांगणाऱ्याकडे संभाषण कौशल्य असल्यानं ऐकणाऱ्याचा टाईमपास छान होतो पण ते काही खरं नाही. ऐकणाऱ्यांच मनोरंजन होत असेल पण इतक्या गहन स्मृतीमुळे बोलणाऱ्याला मग वर्तमानात जगणं अवघड होऊन बसतं.
संजय