बऱ्याच दिवसांपासून तुमच्या नवीन लेखाची प्रतीक्षा होती.लेख पाहून बरे वाटले. माझ्यासारखे अनेक वाचक तुमचा प्रत्येक लेख
व त्यावरील प्रतिक्रिया वाचत असतात, मात्र त्यावर प्रतिक्रिया लिहितीलच असे नाही. (हा दोष आहे हे मान्य) त्यामुळे तुम्ही प्रतिक्रियांच्या संख्येवर
जाऊ नका व असेच उत्तमोत्तम लिखाण करत राहा असे आवर्जून सांगावेसे वाटते.तुम्ही  आम्हाला आरसा दाखवणे बंद करताय की काय, अशी भीती वाटल्याने  हा खुलासा केला.तुमच्या लेखांचे मूल्य खरोखर ज्यांचा सत्याचा शोध चालू आहे त्यांनाच कळेल.एक लेख "वारंवार विचारले जाणारे प्रश्न" असा टाकल्यास बरे होईल, ज्याच्या प्रतिक्रियांमध्ये कोणालाही मनात येणारे विविध प्रकारचे (स्वैर) प्रश्न विचारता येतील.