कळसश्री,

सत्याचे अनेक आयाम आहेत, संगीताचं मर्म गवसलेला जसा सदैव स्वरात रमतो आणि तरीही त्याचा ध्यास संपत नाही, कुमारांसारखा औलिया गायक  म्हणतो की अजून किती तरी स्वर गायले गेले नाहीत; तसं सत्याच आहे.

आरशाचे अनेकानेक पैलू जसे तुम्हाला मोहवतात तसे मलाही भूल घालतात आणि मग मी लिहीतो. कुणी प्रतिसाद दिला नाही तर मला वाटतं माझा अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही मग मी वेगळा पैलू मांडतो. तुमच्या सारख्या एकानी जरी समरसून प्रतिसाद दिला तरी माझं काम झाल्यासारखं वाटतं.

तुम्हाला एक सांगावस वाटतं की सत्य शोधणारा हरप्रकारे ते शोधेल, माझं लेखन थांबलं तर दुसरीकडून त्याला मार्ग दिसेल त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा. अस्तित्वाचे रंग अनाकलनीय आहेत केव्हा काय होईल ते सांगता येत नाही पण शोधणाऱ्यानी हार मानता कामा नये.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न मी एका लेखात मांडलेत (तुम्ही माझ्या सदस्यत्वातून तो लेख बघू शकाल), याशिवाय तुम्ही कोणताही प्रश्न माझ्या कोणत्याही लेखावर विचारा.

संजय