संजयजी,
जर स्मृती आरश्यावर पांघरूण घालते तर मूळात स्मृतीचं प्रयोजनच काय? मनुष्येतर प्राणी जरी केवळ "इन्स्टींक्ट" वर जगतात, तरी उदर भरण करताना, झोपताना, स्वसंरक्षण करताना त्यांना त्यांच्या योनीसापेक्ष्य - म्हणजे यक्तीसापेक्ष्य हालचाली कराव्या लागतात. वाघ माजे लागला तर हरिण उडायचा प्रयत्न करत नाहि, घोडा ट्रायल म्हणून सुद्धा चिकन खात नाहि. हे त्यांचे व्यक्तीसापेक्ष्य वर्तन नाही काय?
दुसरं असं कि जर माणसाला प्रत्येक जाणीव स्मृतीतून कळते, वा प्रत्येक जाणीव स्मृती चाळवते तर निरकाराची जाणीव देखील स्मृतीला काहिना काही सिग्नल देत असावी. तो सिग्नल पकडता योतो का ?