>> ...म्हणून मी म्हटलंय आपण आरसा आहोत हा बोध कायम ठेवून स्मृतीचा वापर करणं कौशल्याच आहे.
--- ह्म्म्म्म... देन इट मस्ट बी डिफिकल्ट... 
>> हा चकवा आहे आणि एकसंध आणि निर्वेध जगणं ही अंत:प्रेरणा आहे.
--- मी एक प्रयोग केला बरेच दिवस.  "मला काय करायची   इच्छा     होतेय" आणि "मी काय करायला हवं" या दोन पथांवर मी आलटून पालटून काम केलं. माझा  अनुभव असा कि "मी काय करायला हवं" यातून मिळणारं सुख आणि समाधान "मला काय करायची  इच्छा   होतेय" पेक्षा नेहमीच जास्त आणि स्पष्ट होतं. माझा प्रयोग कुठे चुकला असेल काय? इन फॅक्ट, मला असं जाणवायला लागलं कि   शेवटी इच्छा म्हणायची   "मला काय करायला हवं" हिच एक्चुअल इच्छा होती... मला कळेना कि इन्स्टींक्ट कुठे चुकला...