मी : म्हणून मी म्हटलंय आपण आरसा आहोत हा बोध कायम ठेवून स्मृतीचा वापर करणं कौशल्याच आहे.
तुम्ही : --- ह्म्म्म्म... देन इट मस्ट बी डिफिकल्ट...
= नो इट इज सो सिंपल बट ओन्ली नॉट ट्राइड!
जर आपण स्वत:शी सतत संपर्क ठेवून असलो (आणि तो बाय डिफॉल्ट असतोच, फक्त त्याची दखल घ्यायला लागते) की प्रत्येक क्रिया सुखदायी होते, ते गाण्याला शांततेची बॅकग्राऊंड असण्यासारखं आहे.
तुमचा प्रश्न : --- मी एक प्रयोग केला बरेच दिवस. "मला काय करायची इच्छा होतेय" आणि "मी काय करायला हवं" या दोन पथांवर मी आलटून पालटून काम केलं. माझा अनुभव असा कि "मी काय करायला हवं" यातून मिळणारं सुख आणि समाधान "मला काय करायची इच्छा होतेय" पेक्षा नेहमीच जास्त आणि स्पष्ट होतं. माझा प्रयोग कुठे चुकला असेल काय?
= कार्योन्मुखताच तर अस्वास्थ्य आहे!
ट्राय टू अंडरस्टँड, स्वरूप ही नुसती मोकळीक आहे, या मोकळीकेचं भान ठेवून कार्यरत होणं हे अंतिम आहे, पण सुरुवातीला निदान मोकळीकेचा अनुभव तर यायला हवा ना?
जर आपण "मला काय करायची इच्छा होतेय" आणि "मी काय करायला हवं" या दोन पथांवर आलटून पालटून काम करत राहिलो तर जाणीव (म्हणजे आपण) सदैव उन्मुख राहू आणि अकर्त्याशी (म्हणजे स्वत:शी) आपला संपर्कच होणार नाही. तुमची नाही साऱ्या जगाची हीच परिस्थिती आहे, सदैव कार्योन्मुखता! तुम्ही माझा याच नावाचा लेख बघा.
अंत:प्रेरणा ही अस्तित्वागत चाहूल आहे, ती अनिवार्यता नाही. साधं भुकेच उदाहरण घ्या, आपण भूकेकडे दुर्लक्ष करून काम करू शकतो पण खरी भूक असेल तर ती हळूहळू खुणावत राहते (आपण झटून अंगमेहेनत करत नाही की खेळत नाही म्हणून ही संवेदना क्षीण झालीये). तुम्ही सर्व काम थांबवून, सेल फोन बंद करून, पेपर, टीवी काहीही समोर न घेता शांतपणे भूकेकडे लक्ष दिलं तर काय खावं हे तुम्हाला कळेल आणि ते जेवण तुम्हाला सुख देऊन जाईल कारण स्वास्थ्य (अनओरियंटेड कॉंशसनेस) आणि अंत:प्रेरणेचा मेळ तुम्ही घातला असेल.
तुमचा प्रश्न : मी इच्छा आणि अंतःप्रेरणेत गफलत करतोय काय? तसं असेल तर हि गफलत कशी टाळावी??
= अंत:प्रेरणा ही अस्तित्वाची इच्छा आहे आणि व्यक्तिगत इच्छा ही आपला स्वत:शी संपर्क न होऊ शकल्यानी (किंवा आध्यात्मिक शब्दात स्वरूपाच्या विस्मरणामुळे) आलेल्या अस्वास्थ्यावर माणसानी शोधलेला उपाय आहे.
तुम्ही मला समजावून घेऊ शकत असाल तर मोठ्या धाडसानी मी सांगतो की मग तो उपाय समाजसेवा असो, देशभक्ती असो, कोणताही विश्वविक्रम असो की असामान्य साहस असो की सांपत्तिक जमवाजमव, की पर्यटन किंवा धार्मिकस्थळांच्या भेटी असोत, त्यातून थोडाफार दिलासा मिळतो पण आनंद कधीही होत नाही कारण मुळ अस्वास्थ्य बर्करार असतं!
संजय