विजेवर चालणाऱ्या गाड्या हा पर्यायही अजून तितका प्रॅक्टिकल नाही. 

इलेक्ट्रिक कार्सना बॅटरी हा खूप मोठा अडथळा आहे. बॅटरी सतत चार्ज करावी लागते आणि त्यासाठी लागणारा वेळ हे मोठे आव्हान आहे. पेट्रोलची टाकी पूर्ण भरायला त्यामानाने खूपच कमी वेळ लागतो. जपानी तज्ञांनी 'एक चहाचा कप संपवण्यास लागणारा वेळ' हा बेंचमार्क धरला असून इतक्या वेळात संपूर्ण बॅटरी कशी रीचार्ज कशी होईल ह्यावर संशोधन चालले आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे विद्युत ऊर्जा. लोक दिवसा चालवून रात्री मोटार रिचार्ज करतील ह्या गृहीतकावर इलेक्ट्रिक कार्सच्या ऊर्जेचे बिझनेस मॉडेल आधारले आहे. पण समजा लोकांनी दिवसाही रीचार्ज करण्यास सुरुवात केली तर काय होईन? किंवा पीक डिमांडच्या वेळेला (उदा. संध्याकाळी जेव्हा घरातील बहुतांश उपकरणे चालू असताना) अनेकांनी गाड्या चार्जिंगला लावल्या तर ग्रीडला तो भार सोसवेल का? इ. गोष्टींना अजून उत्तरे नाहीत.

सध्या बाजारात निसान लीफ ही संपूर्णपणे बॅटरीवर चालणारी कार बाजारात गेल्यावर्षीपासून उपलब्ध आहे. तसेच टेस्ला नावाची महागडी स्पोर्ट्स कारही बाजारात उपलब्ध आहे. पुस्तकात ह्यावरही बरीच पाने लिहिलेली आहेत. निसान लीफची पूर्ण जन्मकथा सांगितली आहे.

बॅटरीवर चालणारी कार ही संकल्पना आपल्याला वाटते तितकी नवीन नाही. गाड्यांच्या सुरुवातीच्या काळात खुद्द एडिसनने ह्यावर खूप मेहनत घेतली होती. पण त्याचे बॅटरीवर चालणारे मॉडेल फोर्डच्या गाडीपुढे मागे पडले. शेवटच्या प्रकरणांमध्ये ह्या सगळ्या विषयी खूप रोचक माहिती पुरवली आहे.

विजेशिवाय, बायोडिझेल विशेषतः 'स्वीचग्रास' नावाच्या गवतापासुन तेल मिळवणे ह्या पर्यायांवरही भरपूर संशोधन सुरू आहे, पुस्तकात त्याचा बराच उहापोह केला आहे.