झुकिनी म्हणजे घोसवळे नव्हे, पण तशी दिसणारी भाजि. घोसावळ्याचा वेल असतो. झुकिनिचे वांग्याप्रमाणे झुडुप असते. घोसावळे शिजवायचा प्रयत्न केल्यास जवळ जवळ लगदाच होतो पण झुकिनिचे तसे होत नाही. झुकिनीचा  गर बराचसा परवराच्या गरा सारखा किंवा किंचित कोवळ्या खोबरऱ्यासारखा असतो.

भाराबरोबर चांगले लागेल.. कुठलाही भाजी सदृश प्रकार ब्रेड ऐवजी भाताबरोबर खाणे ठीक आहे. पण जो पदार्थ पावा बरोबर खाण्यात मजा आहे तो वेगळ्या पद्धतीने दुसऱ्या कुठल्याही पदार्थाबरोबर खायला तितकिशी मजा येइल का हि शंका आहे. शेवटी आवडिचा प्रश्न आहे. उदा. पाव भाजी मधिल भाजी भाताबरोबर वाईट लागणार नाहि... पण पाककृती देताना पावा बरोबरच खावी असे लिहु ना आपण?