>प्रयास आणि निष्प्रयासातला बॅलन्स साधा हे वाक्य आठवलं...
मी हे ट्राय केलं.. आणि लक्षात आलं, प्रयास होतोय म्हणजे कुणाकडून तरी होतोय (मानलेली व्यक्ती)...... म्हणजे आपण व्यक्ती नसून खुद्द तो मधला बॅलन्सच आहोत की...!
= येस अँड अ थाऊजंड टाईम्स येस!
आपण तो बॅलन्सच आहोत, म्हणून आहोत निश्चीत पण नक्की कुठे ते सांगता येत नाही किंवा इतके सर्वत्र आहोत की कुठेही गेलो आणि कोणतिही वेळ असो आपण आहोतच! आपण नाही असं स्थान नाही आणि तशी वेळही नाही. व्यक्ती म्हणून आपण काल आणि स्थानबद्ध आहोत पण ‘तोल’ म्हणून नाही.
संदीप खरेच्या ओळी आहेत:
कशी ही अवस्था, कुणाला कळावे?
कुणाला पुसावे, कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो
असा तोल जाता कुणी सावरावे?
प्रश्न खोल जाण्याचा नाहीये, आपणच तो तोल आहोत हा उलगडा होण्याचा आहे! लगे रहो उन्मेश!
संजय