मूळ लेखकाच्या स्पष्टीकरणानंतर माझ्या टिपेत केलेला बदल खाली वाचावा:
[१] हा संदर्भ मला कांहींसा संदिग्ध वाटला म्हणून मी मलिकसाहेबांना लिहिले होते. त्यांनी माझ्या प्रश्नाला तत्परतेने दिलेल्या उत्तरावरून बराच उलगडा झाला. त्यानुसार "बलोच मसला दफाई तांझीम" ही बलुची लोकांची सशस्त्र प्रतिकारात्मक संघटना नसून ती पाकिस्तानी लष्कराच्या आशिर्वादाने इंटर सर्विसेस इंटेलिजन्स-मिलिटरी इंटेलिजन्स-फ्रंटियर कोअर या त्रिकुटाने उभी केलेली बलुची लोकांच्या आणि त्यांच्या प्रतिकाराविरुद्ध असलेली संघटना आहे आणि तिचा उद्देश बलुची राष्ट्रवादी नेत्यांना आणि त्यांचे समर्थक असलेल्या पत्रकारांना, वकीलांना आणि लेखकांना टिपून मारणे हा आहे. या संघटनेने कित्येक बलुची नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना टिपून मारल्याचा दावा केलेला आहे.