पावकी-निमकीचे पाढे स्वतः रचावेत, जालावर कशाला शोधायला हवेत?  ते  असे म्हणावेत :-- एक पाव पाव,, दोन पाव अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव एक, पाच पाव सव्वा, वगैरे ते शंभर पाव पंचवीस..  निमकी अशीच.. एक निम्मे निम्मं, दोन निम्मे एक, तीन निम्मे दीड वगैरे.  हे पाढे स्वतः रचणे उत्तम, पण कंटाळा येत असेल तर अंकलिपीत असतातच, तिथून उतरवून घ्यावेत.  तिथे पाउणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी, एकोत्री आणि अकरकीसुद्धा सापडतील.  आणि आणेदेखील.  ते असे म्हणावेत:--एक पैसा पाव आणा, दोन पैसे अर्धा आणा पासून ते सरतेशेवटी चौसष्ट पैसे एक रुपाया पर्यंत.