सांगली या गावाशी परिचित नसल्यामुळे लेख वाचलाच नव्हता, पण वाचल्यावर मात्र "त्या " सांगलीचा परिचय झाला  लेख नेहमीप्रमाणेच उत्तम आहे. विशेषतः
कुलकर्ण्यांचा वडा चवीपेक्षा लहान आकार आणि मालकाचा उद्धटपणा यांमुळेच अधिक लक्षात आहे
सतत  सांधेदुखीची  तक्रार  करणारे  एखादे  किरकिरे आजोबा  एखाद्या  दिवशी  ट्रॅक  सूट  घालून,  कलपबिलप  लावून  जॉगिंगला  जाताना  दिसावे  तसे  काहीसे  या  नव्या  'आनंद'  कडे  बघून  वाटत असे.
त्यामुळे वालचंदची मुले विलिंग्डनवर 'डोळे शेकायला' येत असत.
त्यांचे  हे  असले ' आंखो  ही  आंखों  में'  होणारे  इशारे   आम्ही दुसऱ्याच्या हातातले जिलबीचे कडे बघावे तसे बघत असू. 
अशा वाक्यांमुळे वाचनीय झाला आहे.