एकोत्री म्हणजे एक ते शंभरपर्यंतच्या आकड्यांचे वर्ग.  म्हणताना असे म्हणायचेः--- एक एके एक, बे दुणे चार, तीन त्रिक नऊ, ... पंचवीस पंचविसे पंचवीस सहा, ... एकतीस एकतिसे एकसष्ट नऊ, ... एक्याण्णव एक्याण्णव एक्याऐंशी ब्याऐंशी(८२८१),.. ‌शंभर शंभर शंभरशे.

अकरकी म्हणजे अकरा ते वीस पर्यंतचे अकराच्या पुढचे पाढे.  अकरं अकरे एकवीसासे, अकरं बारे बत्तीसासे,... अकरं वीसे वीसेदोन(२२०), ...एकोणीस अकरे नवोत्रीदोन(२०९), एकोणीस बारे अठ्ठावीस दोन(२२८).. एकोणीस वीसे ऐंशीतीन((३८०)... वीसं वीसे चारशे. वगैरे.  हे सर्व पाढे सुदैवाने मला अजूनही पाठ आहेत.   एम्आर्आयच्या टेबलावर तासभर झोपायला लागले तर सर्व स्तोत्रे म्हणून झाल्यावर शेवटी हे पाढे उपयोगी पडतात.