ॐकारराव,
आपण केलेले एक एक प्रश्न इतके मोठे आहेत की तो एक एक स्वतंत्र चर्चाविषय होऊ शकेल असे वाटते.
इंग्रज आले नसते आणि समजा अशी क्रांती झाली असती तर ...
इंग्लिश आणि इतर युरोपीय लोक भारतात आले नसते तर औद्योगिक क्रांती झाली असती का हा कळीचा प्रश्न आहे. पंधराव्या शतकापर्यंत युरोपात अंधारयुग (डार्क एज) होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारतास पोहोचण्याचे नवे सागरी मार्ग शोधले जाऊ लागले. वास्को द गामा आणि इतर युरोपीय भारतात पोहोचले आणि युरोपात औद्योगिक क्रांती झाली.
तेंव्हा हे लोक भारतात आले त्यामुळेच त्यांना प्रगत शास्त्र, प्रगत संस्कृती ह्यांचे थोडेफार ज्ञान मिळाले असे म्हणावे लागेल.
जे जे चांगले आहे ते आपण त्यांच्याकडून नव्हे तर तेच आपल्याकडून शिकले असे म्हणावे लागेल.
आपला
(आत्मसंतुष्ट) प्रवासी