आमच्या इथे पण असेच अगम्य आवाज येत असतात. सध्या एक आवाज दुपारी येतो 'ईईया' बघावे तर बांगड्यावाला असतो. 'चुडिया' च्या जागी फक्त ईईया. माझ्या माहेरी मागे एक मीठवाला यायचा. तो फक्त आवाजच काढतोय असे वाटायचे. त्यामुळे त्यालाच मीठपाण्याच्या गुळण्या करायचा सल्ला एकाने दिला होता.